About Us
पत्रकारिता करत असताना आयुष्यभर स्वतःची दुःख लपवत समाजासाठी जगावं लागतं, लेखणीच्या धारदार शस्त्रांने अनेकांना सरळ करण्याची क्षमता, ही पत्रकारात असते, फक्त पत्रकार हा राजकारण्यांच्या दावणीला बांधला नाही पाहिजे, स्वतःची तत्व निष्ठा आणि स्वाभिमान खुंटीला गुंडाळून न ठेवता, जे सत्य आहे ते दाखवता आलं पाहिजे, जे चांगलं आहे त्याची पाठराखण केली पाहिजे, जे वाईट आहे ते समाजासमोर मांडलंच पाहिजे, तरच ती पत्रकारिता , भ्रष्टाचार समाजाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे, जर ही कीड आपणाला संपवायची असेल तर पत्रकारांनी त्यावर प्रहार करणं गरजेच आहे ती खरी पत्रकारिता आणि तेच काम गेले 19 वर्षे नव केसरी वृत्तपत्र आणि न्यूज चैनल च्या माध्यमातून मी करतोय याच मला समाधान आहे. जय महारा
आपले प्रश्न असतील तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही नव केसरी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी तत्पर आहोत